निखिल जगताप बेलसर प्रतिनिधी
पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ पुरंदर यांचे काम बंद आंदोलन 22 जुलै(गुरुवार) रोजी सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय विभाग आणि खाजगी सेवा पुरवणारे डॉक्टर यांच्यातील प्रश्नांमुळे पुरंदर तालुक्यातील पशुधन धोक्यात आले आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील गोरगरीब शेतकरी चिंतेत पडला आहे. जनावरांच्या उपचाराची सोय तालुक्यामध्ये कोठेच होत नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुरंदर तालुक्यातील गावांमध्ये दुग्ध व्यवसाय हा महत्त्वाचा व्यवसाय आहे एका गावामध्ये जवळपास पाच ते सहा हजार पशुधन आहे. अशी तालुक्यामध्ये जवळपास शंभर गावे आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तालुक्यात फक्त वाल्हे, परिंचे व सासवड या ठिकाणीच फक्त डॉक्टर उपचार करू शकतात. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. बऱ्याच गावांत जनावरे मृत पकडण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे बेलसर(ता.पुरंदर) ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देऊन काम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील रहावे अशी मागणी पुरंदर तालुक्याच्या वतीने करण्यात आली.
गेली पाच दिवस तालुक्यातील जनावरावर उपचार करण्यासाठी कुणीही डॉक्टर मिळत नाही व तालुका अधिकारी यांना फोन केला तर जनावरे सासवडला घेऊन या असे उत्तर दिले जात आहे. तर बऱ्याच वेळा त्यांचा मोबाईल बंदच असतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असल्यामुळे व प्रशासनाकडून काहीही हालचाल न झाल्यामुळे बेलसर येथील शेतकरी पशुपालक 29 जुलै(गुरुवार) रोजी तहसीलदार कचेरीवर आंदोलन करणार आहेत. अशा आशयाचे निवेदन मा.तहसीलदार सो. यांना देण्यात आले.
सदर संप हा राज्यव्यापी संप आहे. त्यासाठी प्रशासन नेहमीच सक्रिय आहे परंतु खाजगी डॉक्टरांना कोणताही अडथळा पशुवैद्यकीय विभागाकडून केला जात नाही, त्यांनी तालुक्यामध्ये काम सुरु करावे. विभाग पशुवैद्यकीय विभाग नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करीत आहे. त्यामुळे प्रशासन शेतकऱ्यांच्या बाजूने सक्रिय असल्याची माहिती तालुका अधीक्षक यांनी दिली. पुरंदर तालुक्याचे सभापती नलिनीताई लोळे,सासवड पोलिस स्टेशन चे मुजावर साहेब आणि संबंधित वैद्यकीय विभाग काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये सर्वांनीच सक्रीय सहभाग शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास दिला.