पुरंदर मधील पत्रकारांचा आरोग्य विमा दिल्याने समाधान : खा.सुप्रिया सुळे.                    सुदामआप्पा इंगळे मित्रपरिवाराचा उपक्रम.

पुरंदर मधील पत्रकारांचा आरोग्य विमा दिल्याने समाधान : खा.सुप्रिया सुळे. सुदामआप्पा इंगळे मित्रपरिवाराचा उपक्रम.

पुरंदर

पत्रकारांनी कोरोनाच्या काळामध्ये आपल्या जीवाची बाजी लावून रस्त्यावरती उतरून काम केले. सरकारची कामं आणि लोकांच्या समस्या आपल्या समोर मांडल्या. पत्रकारांच्या विविध समस्यांमध्ये त्याच्य विम्याच विषय होताच. त्याच अनुषंगाने पुरंदर तालुका पत्रकार संघातील पत्रकारांची आरोग्य विमा पॉलिसी उतरण्याचा निर्णय सुदामआप्पा इंगळे मित्रपरिवाराने सुदामआप्पा इंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेतल्याने समाधान वाटतयं असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

मंगळवार (दि.१) रोजी महात्मा फुले विद्यालय, शिवरी येथील शरदचंद्रजी पवार साहेब सभागृहात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळेयांच्या हस्ते पुरंदर तालुक्यातील पत्रकारांना मोफत आरोग्य विमा पॉलिसी वाटप करण्यात आल्या त्यावेळी सुळे बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरंदरचे आमदार संजय जगताप होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माणिकराव झेंडे, नंदुकाका जगताप, बाळासाहेब कामथे, शामकांत भिंताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

सुदाम इंगळे मित्रपरिवार यांच्यामार्फत पुरंदर तालुक्यातील मराठी पत्रकार परिषद मुंबईचे सदस्य असलेल्या पुरंदर तालुक्यातील २७ पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी केले. सुत्रसंचलन निखिल जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दत्तानाना भोंगळे, उपाध्यक्ष प्रवीण नवले, सचिव अमोल बनकर,सहसचिव मंगेश गायकवाड,कार्यकारणी सदस्य निखिल जगताप, संतोष डुबल, विशाल फडतरे, संतोष जगताप, सुनिता कसबे, हनुमंत वाबळे, अक्षय कोलते आदींनी परिश्रम घेतले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *