पुरंदर
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक ग्रामपंचायतीने डिजिटल ॲप द्वारे दाखले देण्यासाठी सुरू केले आहे,आता घरबसल्या दाखले मिळणार त्यामुळे नागरिकांना ग्रामपंचायतीमधील सुविधा ऑनलाईन मिळू लागल्या आहेत या ॲपद्वारे ग्रामपंचायत हद्दीतील घराचा उतारा, जन्म नोंद प्रमाणपत्र ,मृत्यू नोंद प्रमाणपत्र, विवाह नोंद प्रमाणपत्र आणि कराचा भरणा करता येत आहे, महाराष्ट्र शासनाने महाई ग्राम सिटीझन कनेक्ट नावाचे एप्लीकेशन सुरू केले असून” आता सर्वांना घरबसल्या ग्रामपंचायतचे सर्व दाखले मोबाईल ॲप द्वारे पाहू शकणार आहेत,
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक ग्रामपंचायतीने डिजिटल ॲप द्वारे आज अखेर 61 व्यवहारांची नोंद केली असून” पुणे जिल्ह्यात सर्वाधिक व्यवहार नोंदी करून कोडीत बुद्रुक ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकवल्याची माहिती ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच रंजना खुटवड यांनी दिली, ग्रामपंचायतीने डिजिटल ॲप विषयी गावातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली, तसेच डिजिटल ॲप विषयी गावातील नागरिकांना माहिती सांगण्यात आली व नागरिकांना डिजिटल ॲप वापरण्यास प्रोत्साहित करण्यात आले. ॲप विषयी नागरिकांना माहिती मिळाल्यामुळे त्यांनी आपले प्रॉपर्टी टॅक्स भरण्यास सुरुवात केली व आपले दाखले प्रमाणपत्र ऑनलाइन काढण्यास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत,
महा इ ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे व नागरिकांना त्या ॲप विषयी माहिती देण्याचे काम ग्रामपंचायत कोडीत बुद्रुकचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक , डेटा एंट्री ऑपरेटर व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी केले. ग्रामपंचायतच्या वतीने महा इ ग्राम सिटिझन अँप जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम चालू आहे, या डिजिटल ऍप चे महत्व नागरिकांना कळाले असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, ग्रामपंचायतीने राबवलेल्या या डिजिटल ॲपमुळे नागरिकांचे काम सुलभ झाले असून वेळेची बचत होत असल्यामुळे तसेच ग्रामपंचायत अलीकडच्या काळात संपूर्ण गावांमध्ये विकास कामासंदर्भात अग्रेसर काम करत असून नागरिकांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत, दरम्यान’ ग्रामपंचायत पुणे जिल्ह्यात प्रथम आल्यामुळे ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे,