पुरंदर
पुरंदर तालुक्यातील पानवडी येथील अश्वीनी अमर खरात या पानवडी गावचे हाद्दीत सामाईक रस्त्यावरुन घरी जात होत्या त्यावेळी बाळु जयवंत धिवार रा.पानवडी ता पुरंदर जि पुणे याचे घरासमोरुन आले असता तु कोर्टातील केस माघारी घे, तुला कीती पैसे पाहीजेत, तुला बाजारात बसवितो असे म्हणुन शिविगाळ दमदाटी केली. माझा डावा हात पकडुन मुरगाळला. मला अंगावर ओठुन माझ्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे असे वर्तन करुन माझा विनयभंग केला.
पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा कांबळे,मपोहवा घुले करीत आहेत.