पुरंदर
पुरंदर तालुक्यातील केतकावळे येथील बालाजी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या लाखो रुपयांचे दागिने व रोखं रक्कमेची चोरी झाल्याची घटना घडली असून ऋतूराज प्रकाश जाधव वय 30 वर्षे रा.कर्नवडी ता.खंडाळा जि.सातारा यांनी सासवड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे .
याबाबतीत सासवड पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार दि . ३ जुलै २०२२ रोजी सकाळी ९ .४५ वा. ते १० .१५ वा.चे दरम्यान . केतकावळे ता.पुरंदर जि.पुणे येथील बालाजी मंदीराचे पार्कीग मध्ये फिर्यादी यांनी त्यांची मारुती कार नंबर एम.एच.14/एच/9946 मध्ये गळयात अडकविणेचे पर्समध्ये ठेवले होते.
कोणीतरी अज्ञात चोरटयाने कारचा पाठीमागील दरवाजा उघडून पर्समधून 32,000/- रोख रक्कम त्यामध्ये 500, 200 दराच्या नोटा, 1,85,000/- लहान मुलीचे गळयातील सोन्याची चैन 8 ग्रॅम, सोन्याचे पान 2 ग्रॅम, हातातील व पायातील तोडे सोन्याचे प्रत्येकी 5 ग्रॅम दोन्ही मिळून 10 ग्रॅम, कानातील डुल 3 ग्रॅमवजनाचे , 10 ग्रॅम वजनाचे गळयातील मनी मंगळसुत्र त्यामध्येकाळे मणी, लहान लेडीज अंगठी 5 ग्रॅम असे एकूण 38 ग्रॅम चे सोन्याचे दागीने असा एकूण 2,17,000/- रुपयांचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरुन नेले आहेत म्हणून अज्ञात चोरटयाविरुध्द तक्रार आहे. सासवड पोलिसांनी भा.दं.वि.कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे .