पुरंदर
पतीने सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे गुरोळी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या पत्नीला सदस्यत्व गमवावे लागले आहे याबाबत आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे
गुरोळी येथील हर्षा प्रमोद शिंदे यांनी अँड. सचिन लोंढे पाटील यांच्यामार्फत सदस्य सोनाली अनंत खेडेकर यांचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द करण्याकरिता ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 14 ज-3 नुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला तक्रारी अर्जात नमूद केले होते की सोनाली अनंत खेडेकर या ग्रामपंचायत सदस्य असून त्यांचे पती अनंत रामचंद्र खेडेकर यांनी गुरोळी येथील गट नंबर 766 पैकी काही भाग पाझर तलावासाठी संपादित झाला आहे तरी देखील त्यांचे पती अनंत रामचंद्र खेडेकर गट नंबर 766 मधील 0.02 आर क्षेत्र विहीर खुदाई साठी जमीन खरेदी केलेली आहे खरेदी केलेली जमीन ही पाझर तलावासाठी संपादित आहे माहित असूनही विहीर खोदाई करून या जागी अतिक्रमण केले आहे असा आरोप केला होता.
छोटे पाटबंधारे उपविभाग सासवड यांनी दिलेल्या पत्रानुसार पाझर तलावासाठी संपादित क्षेत्रामध्ये विहीर खोदलेली आहे मोजणी नकाशा मध्ये दिसून येत आहे
याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून व कागदपत्रे पाहून सोनाली अनंत खेडेकर यांना अपात्र ठरवले. या कामी दिपेंद्र पुरोहित व दीपक पाटील यांनी सहकार्य केले.