पुरंदर
तालुक्यातील सासवड शहरांमध्ये असणारे नामांकित डॉक्टर उमाकांत ढवळे यांचा दाताचा दवाखाना राऊत आळी येथे आहे.
आपले मूळ गाव लातूर येथून सासवड ला येऊन 21 वर्ष आपल्या दवाखान्या मार्फत उत्तम आरोग्य सेवा देत त्यांनी पुरंदर तालुक्यातील सर्व दिव्यांगांची त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत दंत तपासणी व उपचारावरती 20% टक्के सवलत अशी हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि डॉ.उमाकांत ढवळे व डॉ.ममता ढवळे यांच्यामार्फत दिव्यांगांना मोफत सेवा पुरवली जाणार आहे.
यावेळी सासवड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप,पुरंदर हवेलीचे आमदार माननीय संजयजी जगताप यांच्या विद्या पत्नी राजवर्धिनी (वहिनीसाहेब)जगताप, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव कोलते, भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव,काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप आण्णा पोमण,पुरंदर नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिलजी उरवणे,पंचायत समिती सदस्या सुनिता काकीकोलते,प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे,डॉ.सुमित काकडे, डॉ.प्रवीण जगताप,नगरसेवक संदीप राऊत सासवड शहरातील डॉक्टर मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.