पुरंदर
पुरंदर तालुक्यातील 30 गावातील पोलीस पाटील भरतीसाठी 30 जून रोजी आरक्षण सोडत होणार आहे.या बाबतचे आदेश पुरंदर-दौंडचे उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.
याबाबतची माहिती प्रत्येक गावात देण्याबाबतच्या सूचना तलाठ्यांना देण्यात आल्या आहेत. सबंधित गावातील इच्छुक लोकांनी यावेळी उपस्थित राहण्या बाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे आता पुरंदर मधील तीस गावांना लवकरच पोलीस पाटील मिळणार आहेत.गावातील कायदा व सुव्यवस्था पाहण्याचे काम पोलीस पाटील करत असतात.
नारायणपूर,काळदरी, सोमुर्डी,हिवरे,तोंडल,सुपे खुर्द
हरणी,सोनोरी,आंबोडी,हरगुडे,तक्रारवाडी, कोळविहरे
वाल्हे,बेलसर,देवडी,चिव्हेवाडी,थोपटेवाडी,मांडकी, पोंढे,वीर
सटलवाडी,नवलेवाडी,लपतळवाडी,वागदरवाडी,आडाचीवाडी,सुकलवाडी जवळार्जुन,राजेवाडी,राख,पिंपळे या गावातील पोलीस पाटील भरती साठी ही सोडत होणार आहे.