पुरंदर
पुरंदर तालुक्यातील आंबळे येथे सामाजिक बांधिलकी जोपासत वृक्ष लागवड करण्यात आली.वृक्ष संवर्धन ही काळाची गरज ओळखून ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स व ऋणानुबंध संस्था पुरंदर यांच्या माध्यमातून ही वृक्ष लागवड करण्यात आली.
कोरोना काळात ऑक्सिजन मिळत नसल्याने लोकांवर आलेली वेळ पुन्हा येऊ नये या उदात्त हेतूने ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स यांनी आता वृक्ष संवर्धनासाठी काम सुरू केले आहे.आंबळे गावातील शाळेत झाडे लागवड करण्यात आली आहेत.
चिंच,आंबा,बांबूअशी झाडे लावण्यात आली आहेत.हा स्तुत्य उपक्रम राबवल्याने प्राचार्य व शिक्षकांनी आभार मानले.शाळेच्या मैदानात असलेल्या मोकळ्या जागेत झाडे लावल्यात आली आहेत.
जोतिचंद भाईचंद ज्वेलर्स चे डायरेक्टर मा. श्री. स्वप्नील श्रेणिककुमार शहा यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी गावचे उपसरपंच सचिन दरेकर,अजित जगताप,दिलीप जगताप,अक्षय कोलते,किरण पवार,शाळेच्या मुख्याध्यापिका निना चव्हाण,ज्योतीचंद ज्वेलर्सचे कर्मचारी,गावातील युवक,ऋणानुबंध संस्थेचे संचालक उपस्थित होते.