पुणे
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसारदि.१५ जुन २०२२ रोजी राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक यांना मिळाल्यालेल्या गुप्त बातमीनुसार पुरंदर तालुक्यातील नीरा गावच्या हद्दीत नीरा – लोणंद रोडवर हॉटेल न्यू प्रसन्ना समोरील रोडवर गोवा राज्यात विक्री असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती समजल्यावर सदर माहितीच्या अनुषंगाने पुरंदर तालुक्यातील नीरा गावच्या परिसरातील हॉटेल न्यू प्रसन्न समोरील रोडवर राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक क्रमांक २ पुणे विभागाने सापळा लावला असता मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार भारत बेंज कंपनीचा ट्रक त्यांना दिसून आला सदर ट्रक चालकास ट्रक रोडच्या कडेला घेण्याचा इशारा केला असता ट्रकचालकाने सदर रोडच्या कडेला उभा केला ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा व बिअरचा मुद्देमाल मिळाला त्यावरून ट्रक चालक प्रवीण परमेश्वर पवार वय २३ वर्षे राहणार तांबोळे, तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याला जागीच अटक करून ताब्यात घेतले आहे.
भारत बेंझ कंपनीचा बारा चाकी ट्रक क्रमांक जीजे १० टिटि ८१७६ या ट्रकमध्ये गोवा राज्यात विक्री असलेले १)टूबर्ग बियर चे ५०० मिली क्षमतेचे ९० बॉक्स ,इम्पेरियल बल्यू व्हिस्की चे १८० मिली क्षमतेचे ७९२ बॉक्स३) इम्पेरियल बल्यू व्हिस्की ७५० मिली क्षमतेचे ७८ बॉक्स विदेशी मद्यसाठा व बियर रुपये ६६ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा, दोन मोबाईल फोन ३२ हजार रुपये व वाहनाची किंमत २५ लाख असा एकूण रुपये ९१ लाख ७७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही आयुक्त कांतीलाल उमाप ,संचालक सुनील चव्हाण यांच्या आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त अनिल चासकर, अधीक्षक चरण सिंग बी.राजपूत, उपाधीक्षक संजय आर. पाटील ,युवराज एस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २ या पथकाने केली आहे. सदर कारवाई निरीक्षक तानाजी शिंदे,डी. परब, दुय्यम निरीक्षक, बी.बी. नेवसे, जी. नागरगोजे, पी. डी.दळवी,वाय.एस.लोळे, एम.डी.लेंढे, सर्वश्री जवान एस. बी. मांडेकर ,एन.जे. पडवळ,बी. राठोड, एम. कांबळे, बनसोडे ए.यादव, आर. पोटे व महिला जवान मनिषा भोसले यांनी सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक तानाजी शिंदे हे करीत आहेत.