पुरंदर
सासवड रोडवर मौजे साकुर्डे गावचे हददीत भोगळे मळा सरकार हॉटेल समोर मोटरसायकल व अज्ञात वाहनाचा अपघात झाला असून या अपघातात चार जण गंभीर जखमी तर एक जणांचा मृत्यू झाला असून याबाबत फिर्यादी अण्णा माणिक निकम (वय 32 वर्ष), धंदा- नोकरी केमीकल कंपनी कुरकुंभ रा. शहा ता. इंदापुर जि. पुणे यांनी आरोपी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालक याच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे..
याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 07/02/2023 रोजी सायकाळी 7/30 वाजनेचे सुमारास माझे मेहुने शनि जाधव हे मोटरसायकल नंबर एम.एच. 3 डी. एफ. 5987 शाईन हीचे वरून इंदापुर वरून पुणे येथे माझे मेहने शनि जाधव यांचे बहीनेकडे त्यांचा मुलगा सुषांत घोडके यास सोडण्यासाठी हडपसर पुणे येथे जात असताना जेजुरी सासवड रोडवर मौजे साकुर्डे गावचे हददीत भोगळे मळा सरकार हॉटेल समोर ता. पुरंदर, जि. पुणे येथे त्याचे मोटारसायकलला कोणत्यातरी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून चालवुन माझे मेहूने चालवित असलेल्या मोटारसायकलला ठोस देवून अपघात करून अपघातात माझी बहीन शोभा शनि जाधव (वय 21 वर्ष) हीचे डोकीस गंभीर दुखापत होवून तीचे मुत्यूस कारणीभूत झाला.
तसेच माझे मेहुने शनि जाधव (वय 29 वर्ष) भाचा धनराज शनि जाधव (वय 7 वर्ष), भाची अक्का शनि जाधव (वय 6 वर्ष) व माझे मेहुने यांचे बहीनीचा मुलगा सुशांत रावसाहेब घोडके (वय 3 वर्ष) यांचे गंभीर व किरकोळ दुखापतीस कारभूत झाला व टू व्हीलर मोटार सायकलचे नुकसान करून अपघाताची खबर न देता निघुन गेला म्हणून माझी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरूध्द कायदेशिर फिर्याद आहे. यावरुन जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक खाडे हे करीत आहेत.