पुरंदर तालुक्यातील “या” गावात भर बाजारपेठेत महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीस्वारांनी नेले हिसकावून

पुरंदर तालुक्यातील “या” गावात भर बाजारपेठेत महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीस्वारांनी नेले हिसकावून

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात भर बाजारपेठेत महिलेच्या गळ्यातील तब्बल अडीच तोळ्याचे मंगळसुत्र  दोन दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना घडली असुन मंगल राजेंद्र हाडके, वय – ५० वर्ष, धंदा-गृहीणी, रा. चंद्रभागा बिल्डींग, गांधी चौक, धान्य बाजारपेठ, ता.पुरंदर, जि.पुणे. यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी फिर्याद  आहे दिली की, दिनांक १६ एप्रिल २०२१ रोजी रात्री ०८.०० वा.च्या.सुमारास मौजे सासवड गावच्या हद्दीत चांदणी चौक येथे १,२५,०००/- किमतीचे अडीच तोळयाचे मनीमंगळसुत्र मध्यभागी त्याला दोन सोन्याच्या वाटया पटीमध्ये असले मोटारसायकल वरील दोन अज्ञात चोरटयांनी फिर्यादी यांच्या गळयातील मणीमंगळसुत्र जबरीने हिसकावून चोरून नेले आहे.

म्हणून अज्ञात चोरटयाविरूध्द  फिर्याद दाखल केली आहे.सासवड पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे.सासवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सदर आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून सासवड पोलिसांनी या संशयित आरोपींची फोटो देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल केले आहे.

नागरिकांना आव्हान केल आहे की जर हे कोणाच्या ओळखीचे असतील तर त्यांनी सासवड पोलिस स्टेशन शी संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *