पुरंदर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ता. 25/03/2023 रोजी 15/10 वा. चे सुमारास सासवड गावचे हद्दीतील ऊत्तम हाऊसिंग सोसायटी बंगला नंबर 18 सासवड ता. पुरंदर जि. पुणे येथील राहणारे मामा भगवती प्रसाद शर्मा व बहीण काजल राहूल शर्मा हे दोघे मामाचे राहते घरून त्यांचेकडील अँक्टीव्हा टु-व्हीलर नंबर MH12 PB2318 ही वरून त्यांचे नातेवाईंकांची कपड्याची बँग सासवड एस.टी.स्टँन्ड येथे देण्याकरीता जात होते. सदरची अँक्टीव्हा टु-व्हीलर ही मामा चालवित होते व पाठीमागे माझी बहीण कपड्याची बँग घेऊन बसली होती.
व ते दोघे अँक्टीव्हा टु-व्हीलर वरून पुणे सासवड जेजुरी रोडने सासवड एस.टी.स्टँन्ड येथे जात असताना पाठीमागून येणारा टाटा ट्रक नंबर MH14 AS8142 वरील चालकाने त्याचे ताब्यातील सदरचा ट्रक भरदाव वेगात चालवित येवून ट्रकची अँक्टीव्हा टु-व्हीलरला ठोस बसून अपघात झाला व तेथे जमलेल्या लोकांचे कडून मला अपघातातील ट्रक चालकाचे नाव दशरथ तुळशीराम फुलतांबकर वय 50 वर्षे रा. मु.पो. सुलदरी ता. शेणगाव जि. हिंगोली असे असल्याचे समजले.
सदरचा अपघात हा ट्रक नंबर MH14 AS8142 वरील चालकाचे चुकीमुळे झाला असून सदरचा ट्रक चालक हा माझे मामाचे किरकोळ दुखापतीस व माझी बहीण काजल राहूल शर्मा वय 25 वर्षे हिचे मृत्यूस व अँक्टीव्हा टु-व्हीलरचे नुकसाणीस कारणीभूत झाला आहे. म्हणून त्याचे विरूद्ध तक्रार दिली आहे.
पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा शिंदे करित आहेत.