पुरंदर
पुरंदर तालुक्यातील वाघापूर सिंगापूर चौफुला या ठिकाणी असणाऱ्या निसर्ग हॉटेल मधून काळ्या रंगाची स्प्लेंडर गाडी नंबर एम एच 12 एस व्ही 9801 अंदाजे किंमत 45 हजार रुपये व विवो कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत पाच हजार रुपये असा एकुण पन्नास हजार रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की निसर्ग हॉटेल या ठिकाणी कामास असणारे हर्षद प्रल्हाद हिरवे व ऋतिक पवार हे रात्रीच्या वेळी हॉटेलमध्ये झोपले होते.
झोपताना हर्षद हिरवे यांनी आपला मोबाईल व गाडीची चावी ही डोक्या जवळ ठेवली होती. सकाळी उठल्यानंतर पाहिले असता ऋतिक पवार हा त्या ठिकाणी दिसला नाही हॉटेलच्या आजूबाजूला पाहिले असता गाडीही त्या ठिकाणी दिसली नाही.
यावरून ऋतिक पवार यांनी गाडी व मोबाईल चोरून नेला असल्यामुळे त्याच्या विरोधात हर्षद हिरवे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कानतोडे करीत आहेत.