पुरंदर तालुक्यातील “या” गावातील रेशनिंग दुकानात काळाबाजार

पुरंदर तालुक्यातील “या” गावातील रेशनिंग दुकानात काळाबाजार

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील मौजे मावडी कप येथील शिवशंभो बचत गटाच्या वतीने संशयित आरोपी राजेंद्र सर्जेराव गायकवाड हे रेशनिंग दुकान चालवत होते. या दुकानांमध्ये काळाबाजार झाल्याबाबतची तक्रार पुरंदरचे पुरवठा अधिकारी सुधीर बबन बडदे (वय 48) यांनी यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मावडी येथे शिव शंभो बचत गट रेशनिंग दुकान चालवित असुन राजेंद्र सर्जेराव गायकवाड यांचे भाऊ नामे जालींदर सर्जेराव गायकवाड, बप्पा चाचर दादा पांडे पोलीस पाटील यांनी मावडी क.प. गावातील शिव शंभो बचत गट रेशनिंग दुकान समोरुन एक पिकअप गाडी संशयित रित्या रेशनिंगचे धान्य घेऊन जात असताना इसम नामे जालींदर सर्जेराव गायकवाड यांनी सदर पिकअप गाडी अडविण्याचा प्रयन्त केला असता गणेश शंकर राणे (रा. जवळार्जुन) यांने जालींदर सर्जेराव गायकवाड यांना पिकअप गाडीचे समोरुन बाजुला ओडुन गाडीस पळुन जाणेस मदत केली.

तसेच सदर पिकअप गाडीतील हमाल दिलीप सुरेश राम (रा. सुपे ता. बारामती) हा खाली राहीलेने मिळाला त्यास सदर पिकअप बाबत चौकशी केली असता त्यावरील मालकाचे नाव शुभम चांदगुडे असे असलेचे सांगत आहे सदर बाबत यातील तक्रारदार जालींदर सर्जेराव गायकवाड यांनी मंडल अधिकारी यांना घेऊन येऊन शिवशंभो रेशनिंग दुकानचे स्टॉक चेक करून परत येतो असे म्हणाले व निघुन गेले. सदर बाबत जेजुरी पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली असुन सदर तपासावरून आम्हास अहवाल सादर करणे बाबत कळविले होते.

त्यानुसार सदरच्या दुकानाचे सर्व दप्तरे पाहिले असता यामध्ये तफावत आढळून आली असल्याने सदरच्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक उमेश तावसकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *