पुरंदर तालुक्यातील “या” गावातील धक्कादायक प्रकार ; अवैध हातभट्टी दारू विक्रेत्याने पोलिसाला शिवीगाळ व दमदाटी करत घेतला हाताचा चावा

पुरंदर तालुक्यातील “या” गावातील धक्कादायक प्रकार ; अवैध हातभट्टी दारू विक्रेत्याने पोलिसाला शिवीगाळ व दमदाटी करत घेतला हाताचा चावा

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे . वनपुरी येथे हातभट्टी दारूची विक्री करणार्‍याने  कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी यांच्या  हाताला चावा घेऊन शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली असून यातील हल्ला झालेले जखमी  पोलीस अंमलदार राजीव घनशाम सापळे यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . 

याबाबतीत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  दिनांक ८ जून २०२२ रोजी सायंकाळी ७ .१०  वा.च्या.सु. पुरंदर तालुक्यातील  वनपुरी  येथे मल्हार डेअरीच्या पाठीमागे आरोपी  चंद्रकांत मारूती कुंभारकर वय 57 वर्षे, वनपुरी, ता.पुरंदर, जि.पुणे याने प्रत्येक 20 रू.किमंत 180 मिलीच्या 37 प्लास्टीकच्या पिशव्या. एकुण 740/- रूपये किंमतीची  गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असताना त्याला फिर्यादी यांचा  संशय आल्याने तो पळून जावू लागला. फिर्यादी यांनी त्याच्यापाठीमागे जावून त्याला पकडले. तो  पोलिस कर्मचारी सापळे यांच्याशी  झटापट करू लागला.

आरोपी चंद्रकांत कुंभारकर याने पोलिस कर्मचारी राजीव सापळे यांच्या  हाताला चावा घेवून   त्यांना शिवीगाळ दमदाटी करून लागला. पोलिस कर्मचारी राजीव सापळे  हे  सरकारी काम करीत असताना आरोपी  चंद्रकांत मारूती कुंभारकर याने सरकारी कामात अडथळा आणला.

म्हणून त्याच्याविरूध्द भा.दं.वि.क. 353, 504, 506, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम 65 ई प्रमाणे  सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलिस निरीक्षक विनोद महांगडे हे करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *