पुरंदर
चांबळी (ता. पुरंदर) येथील विद्यमान सरपंच प्रतिभा संदीप कदम यांच्याविरुद्धत रामचंद्र मारुती शेंडकर यांनी सरपंच यांचे सासरे सर्जेराव शंकर कदम यांनी ग्रामपंचायत मालकीच्या सिटी सर्व्हे नंबर ६३२ यावर अनधिकृतपणे अतिक्रमण करून दोन इमारती उभ्या केल्या आहेत, अशी तक्रार केली होती. यात प्रतिभा कदम यांचे सरपंचपद कायम ठेवण्यात येत आहे. तर अर्जदार यांचा अर्ज निकालपत्रात दिलेल्या कारणास्तव फेटाळण्यात येत असल्याचा निकाल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला.
चांबळी गावच्या विद्यमान सरपंच प्रतिभा संदीप कदम आहेत. त्यांची सिटी सर्व्हे नंबर ६३२ लागून पूर्व बाजूला त्यांच्या स्वतः चा ४०४ लगत गट आहे, याचा फायदा घेऊन प्रतिभा कदम यांनी ग्रामपंचायत मिळकत नंबर ६३२ मध्ये राजकीय आशीर्वादाने अतिक्रमण करून दोन इमारती उभ्या केल्या व या इमारतींचे त्यांच्या गट नंबर ४०४ मध्ये आहेत, असे भासवले.
ग्रामपंचायतीच्या सर्वे नंबर ६३२ मध्ये सरपंच प्रतिभा संदीप कदम यांनी बांधलेल्या इमारतीचा कुटुंबाला फायदा होत असल्याचे कारणाने तक्रारदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सरपंच प्रतिभा कदम यांचे पद अवैध ठरवण्यासाठी अर्ज केला होता.
यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सुनावणी घेत तहसीलदार यांच्याकडील कागदपत्रांची पाहणी करून प्रतिभा कदम यांनी सिटी सर्व्हे नंबर ६३२ मध्ये गावठाण अथवा कोणते शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केलेले दिसून येत नाही. यामुळे प्रतिभा कदम यांचे सरपंचपद कायम ठेवण्यात येत आहे. तर अर्जदारांचा अर्ज हे फेटाळण्यात येत असल्याचा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.