पुरंदर
सासवड पोलिस स्टेशनकडुन मिळालेली माहिती
मी सिताराम कोंडिबा बोराडे दि.24/9/2021 रोजी माझी बहिण इंदुबाई वाडकर रा.वेळु ता.भोर जि.पुणे हिच्या नवर्याचा भरणी कार्यक्रम होता. तिचा नवरा मरण पावले पासुन दर महिन्याच्या एकादशीला जेवायला तिच्या घरी जात होतो. आज पण त्यांच्या घरी जात होतो मी सकाळी 10:00 वा.चे सुमा. सोमुर्डी येथुन माझे अँक्टीवा गाडीने वेळु येथे जाणेसाठी निघालो. सोबत माझी पत्नी लक्ष्मी व नातु पुष्कर हे होते. पत्नी माझे पाठीमागे व पुष्कर पुढे बसला होता. मी वारवडीच्या थोडे पुढे आलो. समोरून एक बोलेरो पांढर्या रंगाची गाडी जोरात आली. गाडीच्या चालकाने त्याची साईड सोडुन तो सरळ माझे अंगावर आला व मला जोरात धडक दिली. धडक बसल्याबरोबर आम्ही खाली पडलो. तेव्हड्यात बोलेरो गाडीतुन विलास बबन बोराडे हा हातात दांडके घेवुन खाली उतरला. तेव्हड्यात आमचा नारायणपुर येथील शांताराम गोळे हा पाहुणा पाठीमागुन आला. आम्हास पडलेले बघुन थांबला. तो आमचेकडे आला त्याला बघुन विलास म्हणाला, तु कोण बोलणार गोळे पाहुण्यांनी फोन करून आमचा भाचा बाळासाहेब वाडकर यांची गाडी बोलवुन घेतली व त्या गाडीतुन आम्हाला खेड शिवापुर येथील श्रीयश हॉस्पीटल मध्ये आणुन अँडमीट केले. विलास बोराडे हा तेथुन गाडी घेवुन निघुन गेला.
मला तोंडावर, उजव्या पायाला, डाव्या पायाच्या गुढघ्याच्या वर मार लागुन गंभीर दुखापत झाली आहे. माझ्या पत्नीला डोक्याला, पायाला मार लागला आहे. व नातवाला डोक्याला व गळ्याला मार लागला आहे. माझी अँक्टीवा गाडी नं.MH12 PK458 चे समोरील बाजुस धडक लागल्यामुळे नुकसान झाले आहे. विलास बोराडे यांच्या बोलेरो गाडीचा नं.MH12 KJ3200 असा आहे.
विलास बोराडे याने मला जीवे मारण्याच्या उद्देशाने जाणून बुजून बोलेरो गाडीने माझ्या गाडीला धडक दिली आहे. विलास व आमच्यात दोन महिन्यापुर्वी शेताचे कारणावरून भांडण झाले होते. त्यावेळी त्याने मला मारून टाकायची धमकी दिली होती. आज सकाळ पासुन विलास हा गाडी घेवुन मरीआईच्या मंदिराजवळ थांबला असल्याचे आमचे गावातील धनंजय भांडवलकर याने पाहीले होते.
पुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली लोणकर करित आहेत.