पुरंदर
पुरंदर तालुक्यातील कोडीत गावात चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा एका विहिरीत मृतदेह सापडला होता, या तरुणाच्या मृत्यूच्या बाबतीत हत्या, आत्महत्या की, अपघात अशी शंका उपस्थित केली जात होती अखेर या तरुणाच्या मृत्यूचे गूढ पोलीस तपासात याबाबतीत अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. यासोबतच मयत तरुणाचे भाऊ संतोष रावा कोकरे, वय २५ वर्षे, रा.दिवे, ता.पुरंदर, जि.पुणे यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १९ मे २०२२ रोजी रात्री ९ वा. चे सुमारास आरोपी दत्ता काळु ठोंबरे याने फिर्यादी यांचा भाउ मयत आनंद याचेवर त्याच्या पत्नी सोबत अनैतीक संबंध आहेत. असा संशय घेतला. त्याला दमदाटी केली व आत्महत्येस प्रवृत्त केले.
म्हणुन कोडीत बुद्रुक गावचे शिवारातील कैलास जरांडे यांच्या विहीरीत भाउ आनंद रावा कोकरे, वय 21 वर्षे याने जीव दिला किंवा काही घातपात झाला असावा अशी फिर्याद दाखल केली आहे.
सासवड पोलिसांनी आरोपी दत्ता काळु ठोंबरे, रा.रिसे पिसे याच्या विरोधात भादवि 306 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सासवडचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.