पुरंदर
तालुक्यातील वाल्हे येथील कुमार वसंत घोरपडे या 21 वर्षे वयाच्या तरुणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल वाल्हे येथील दोघां विरोधात फिर्याद दाखल करण्यात आलीय.याबाबत जेजुरी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम.३०६ ३२३ ३४ ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे
या संदर्भात संगीता वसंत घोरपडे यांनी दिनांक ०२/११/२०२२ रोजी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा कुमार वसंत घोरपडे याचा मृत देह दिनांक २६/०७/२०२२ रोजी निरा नदीमध्ये आढळून आला होता. यानंतर आता तीन महिन्यानंतर मृत कुमार घोरपडे यांची आई संगीता वसंत घोरपडे यांनी जेजुरी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे.
आरोपी योगेश वसंत घोरपडे आणि अंकिता योगेश घोरपडे हे कुमार घोरपडे यांची मोटरसायकल त्याच्या नावावर करून देत नव्हते त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेले अकरा हजार रुपये परत देत नव्हते त्यांनी त्याला वेळोवेळी मारहाण शिवीगाळ व दमदाटी केली त्याला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.