पुरंदर
सासवड पोलिस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार समक्ष पोलीस स्टेशन येथे हजर राहुन जबाब देते की,मी संगीता चंद्रकांत माने वरील पत्त्यावर माझा मुलगा सूरज माने,सुन जना,मुलगी अनुश्री,नातु राजवीर असे एकत्र राहणेस आहोत. माझा मुलगा सूरज पुणे येथे बांधकाम व्यवसाय करतो. माझी सुन आठ दिवसांपूर्वी माहेरी गेली आहे. मुलगी अनुश्री ही चिंचेचा व्यवसाय करण्यासाठी आठ दिवसांपूर्वी आमच्याकडे आली आहे. काल माझे जावई विशाल जाधव हे ही घरी आले होते.
काल दि.12/02/2023 रोजी सकाळी 08.30 वा चे सुमारास मुलगा सूरज उर्फ बिट्टु हा त्याच्या कामासाठी पुणे येथे गेला होता. तो दिवसभर तिकडेच होता. काल रात्री 11.00 वा चे सुमारास आम्ही सर्वजण जेवणखाण करुन झोपलो होतो. रात्री 11.00 वा चे सुमा घरी पोलीस आले होते. त्यांनी मला,तुमचा मुलगा कुठे आहे?असे विचारले. तो पुणे येथे गेला आहे असे मी त्यांना सांगितले. त्यांनी आजुबाजुला चौकशी केली तो सापडला नाही.
त्यानंतर 11.30 वा चे सुमा. 1)गणेष बबन जगताप 2)प्रेम गणेष जगताप 3)गुलाब अर्जुन जगताप 4)सागर नाना जगताप 5) सागर श्रीरंग जगताप 6)सोमनाथ जगताप 7) ज्ञानेश्वर उर्फ माउली(सोन्या) जगताप 8) पप्पु जगताप(जिजाई इलेक्ट्राॅनिक) हे व इतर 200 ते 250 मुले 30 ते 40 टु व्हीलरवरुन सर्वजण हातात काठया,कोयते,तलवारी,बंदुक घेवुन आमच्या घराच्या पुढील बाजूस असलेल्या तालमीजवळ गाडया घेवुन आले. गणेष बबन जगताप व इतर सर्वजण,”ए,बिट्टया चोरासारखा काय लपुन बसलायस. बाहेर ये. तुझ्या आईला….. कैकाडयांना तोडतो,तुझे तुकडेच करतो. असे म्हणुन अश्लील शिवीगाळ करुन जोर-जोराने ओरडत होते. घरात बिट्टु नव्हता. आम्ही घाबरुन दरवाजा उघडला नाही. थोडयावेळाने ते सर्वजण तेथुन निघुन गेले.
आज सकाळी 10.30 वा चे सुमारास किया कंपनीची पांढ-या रंगाची सेल्टाॅस गाडी नं.एम.एच.12,7171 यामध्ये सासवडमधील 1)गणेष बबन जगताप 2)प्रेम गणेष जगताप 3)गुलाब अर्जुन जगताप 4)सागर नाना जगताप 5) सागर श्रीरंग जगताप 6)सोमनाथ जगताप 7) ज्ञानेश्वर उर्फ माउली(सोन्या) जगताप 8) पप्पु जगताप(जिजाई इलेक्ट्राॅनिक) इतर 4-5जणांना सोबत घेवुन हातात लाकडी स्टंप, कोयते,रिव्हाॅल्वर, विटकरी खो-याचा दांडा घेवुन आमच्या घरी आले. त्यांनी मला बघुन,तुला धंदयावर बसवतो. गणेषभाउच्या नादी लागणा-यांचे तुकडे तुकडे करु. असे म्हणाले. मला अश्लील शिव्या देवुन माझ्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्या सर्वांनी माझ्या घरावर दगडफेक केली. खिडकीच्या काचा फोडल्या. घरात माझी मुलगी पैसे मोजत बसली होती. त्यांच्यापैकी 4-5 जण घरात षिरले. कोयता उगारुन माझ्या मुलीच्या हातातील पैशांचा बंडल हिसकावुन घेतला. त्यामध्ये दीड लाख रुपये होते. मी त्यांना अडवायचा प्रयत्न केला परंतु गणेष जगताप याने माझ्या हाताला हिसका मारुन मला ढकलुन दिले. माझा मुलगा हा मध्ये पडला त्यावेळी गणेष बबन जगताप याने त्याचे कमरेचे रिव्हाॅल्वर काढुन मुलगा सौरभच्या डेाक्याला लावली. व यामध्ये 6 गोळया आहेत. तुझी सगळी फॅमिली व कैकाडयांना मारुन टाकतो. असे म्हणाला. सोमनाथ जगताप व त्याचेसोबत आलेल्या मुलांनी माझ्या मुलाला त्यांचे हातातील खो-याच्या दांडयाने व लाकडाच्या स्टंपने डोक्यात मारले व स्टंपने पायावर मारले. त्याला शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार बघुन माझी 95 वर्षांची वयस्कर आई घाबरुन मोठयाने ओरडत होती.
तरी काल दि.12/02/2023 रोजी रात्री 11.30 वा चे सुमा.सासवड येथील 1)गणेष बबन जगताप 2)प्रेम गणेष जगताप 3)गुलाब अर्जुन जगताप 4)सागर नाना जगताप 5) सागर श्रीरंग जगताप 6)सोमनाथ जगताप 7) ज्ञानेष्वर उर्फ माउली(सोन्या) जगताप 8) पप्पु जगताप(जिजाई इलेक्ट्राॅनिक) हे त्यांचेसोबत इतर 200 ते 250 मुले हे सर्वजण हातात कोयते,काठया,तलवारी,बंदुक घेवुन आमच्या घराच्या पुढील बाजूस असलेल्या तालमीजवळ गाडया घेवुन येवुन त्यांनी ”ए,बिट्टया चोरासारखा काय लपुन बसलायस. बाहेर ये. तुझ्या आईला… कैकाडयांना तोडतो,तुझे तुकडेच करतो. असे म्हणुन अष्लील षिवीगाळ करुन माझा विनयभंग केला. तसेच आज दि.13/02/2023 रोजी सकाळी 10.30 वा चे सुमारास पुन्हा 1)गणेष बबन जगताप 2)प्रेम गणेष जगताप 3)गुलाब अर्जुन जगताप 4)सागर नाना जगताप 5) सागर श्रीरंग जगताप 6)सोमनाथ जगताप 7) ज्ञानेष्वर उर्फ माउली(सोन्या) जगताप 8) पप्पु जगताप(जिजाई इलेक्ट्राॅनिक) हे 4-5 जणांना तोंडाला रुमाल बांधुन घेवुन हातात लाकडी स्टंप,विटकरी,कोयते,काठया,खो-याचा दांडा घेवुन आमच्या घरी आले. गणेष बबन जगताप याने मला,”तुम्ही कोणाच्या जीवावर उडया मारताय“ असे म्हणुन अशलील शिवीगाळ केली. तसेच माझ्या घरात शिरुन माझ्या मुलीच्या हातातील दीड लाख रुपये हिसकावुन घेतले. मी मध्ये पडले असता माझ्या हाताला हिसका मारुन मला ढकलुन देवुन माझा विनयभंग केला. गणेष बबन जगताप याने सौरभच्या डोक्याला रिव्हाॅल्वर लावुन,तुझ्या सगळया फॅमिलीला,कैकाडयांना मारुन टाकेन अशी धमकी दिली. त्याचवेळी सोमा जगताप व इतर 3 ते 4 जणांनी सौरभ याला खो-याच्या दांडयाने व लाकडी स्टंपने डोक्यात,पायावर मारहाण केली. आमच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फोडुन नुकसान केले. म्हणुन माझी 1)गणेष बबन जगताप 2)प्रेम गणेष जगताप 3)गुलाब अर्जुन जगताप 4)सागर नाना जगताप 5) सागर श्रीरंग जगताप 6)सोमनाथ जगताप 7) ज्ञानेष्वर उर्फ माउली(सोन्या) जगताप 8) पप्पु जगताप(जिजाई इलेक्ट्राॅनिक) व इतर 200 ते 250 जणांविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे. त्यांना घाबरुन मी तक्रार देण्यासाठी आले नव्हते.
पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महांगडे,पोसई झिंजुर्के करीत आहेत.