पुरंदर
पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या उपाध्यक्षपदी आंबळे गावचे नाजीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचे पत्र नाजीम शेख यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी नुकतेच दिले.
पक्षाचा व संघटनेचा अधिकाधिक विस्तार करुन दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडणार असुन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या सामाजिक समतेचे विचार समाजातील तळागाळात पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नाजीम शेख यांनी सांगीतले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सेलचे तालुका उपाध्यक्ष पद मिळणे ही आंबळे गावासाठी अभिमानाची बाब असल्याचे बोलले जात आहे.कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा व्हीजेएनटी सेलचे अध्यक्ष राहुल गायकवाड, राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे अध्यक्ष संदेश पवार,आंबळेचे उपसरपंच सचिन दरेकर,संदिप जगताप,सुमित लवांडे,अंकुश परखंडे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
👍👌👌👌👌