पुरंदर तालुका युवक कॉंग्रेस च्या उपाध्यक्ष पदी सिंगापुर गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अक्षय उरसळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तिचे पत्र पुरंदरचे आमदार व पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.
अखिल भारतीय कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष राहुल गांधी,भारतीय कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष बी.वी.श्रीनिवास,महाराष्ट्र युवक कॉंग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे,पुणे जिल्हा कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील युवक कॉंग्रेस ची संघटना शक्तिशाली व मज़बूत करणार असल्याचे अक्षय उरसळ यांनी सांगीतले.
या कार्यक्रम प्रसंगी आमदार संजयजी जगताप,तालुका अध्यक्ष प्रदीप अण्णा पोमन,महाराष्ट्र युवक काँग्रेस चे गणेश जगताप, सौ सुनीता काकी कोलते, माऊली यादव,दत्ताशेठ झुरंगे, वीणाताई सोनवणे,मार्तंड भोंडे आदि उपस्थित होते.