पुरंदर
पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे येथे एका महिलेचा गळा दाबून तिच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्या बाबतची तक्रार जेजुरी पोलिसात देण्यात आली आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या बाबतची तक्रार कोळविहिरे येथे राहणाऱ्या साठ वर्षीय अलका दत्तात्रय नेवासकर यानी दिली असून त्यांनी दिलेल्या तक्रार नुसार दिनांक 20/11/ 2021 रोजी चार वाजालेच्या सुमारास कोळविहिरे गावातील फिर्यादी नेवासकर यांच्या घरी त्या घरात एकत्याच असताना त्यांच्या गावातील मुकंद पांडुरंग कुंभार यांची मुलगी गौरी उर्फ तनिष्का मुकुंद कुंभार हिने तिच्या तोंडावर स्कार्प बांधून अचानक त्यांच्या घरात येऊन दोन्ही हाताने त्यांचे तोंड व गळा दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला
या बाबतची फिर्याद त्यांनी पोलिसात दिली आहे…
याबाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक गावडे करीत आहेत. याबाबतची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे.