पुरंदर
पुणे विभागाची पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक2020 रोजी संपन्न झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यातील राजकीय व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे,आमदार संजय जगताप व महाविकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
याच व्यासपीठावर भिवडी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप यांनी महाविकास आघाडी च्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.जिल्हा परिषद कर्मचारी असताना देखील अशा प्रकारे मतदारांना आवाहन करून आदर्श आचार संहितेचे उल्लंघन झालेले आहे.अशा प्रकारची तक्रार पुणे जिल्हाधिकारी यांचेकडे रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष पंकज धिवार यांनी केली होती.
मागील वर्षी प्रांताधिकारी कार्यालय सासवड यांचे समोर तीन दिवसीय आमरण उपोषण केले होते.त्यावेळी पंकज धिवार,युवाध्यक्ष स्वप्नील कांबळे, दीपक वाघमारे,युवराज धिवार,प्रतीक धिवार,असे उपोषणास बसलेले होते.ते उपोषण स्थगित करण्यात आले होते,त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते,परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई केली नव्हती.
त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवसीय आमरण उपोषण केले होते.त्यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जिल्हाधिकारी यांचेशी फोनवरून बोलणं केल्यानन्तर कारवाईचे आश्वासन दिले होते त्यामुळे उपोषण स्थगित केले होते.जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि.21 सप्टेंबर रोजी तीन महिन्यांसाठी निलंबन केले असल्याचे आदेश पत्र संबंधित आस्थापणेला दिले आहे.
याबाबत उपोषणकर्ते पंकज धिवार यांचेशी चर्चा केली असता ते म्हणाले, या प्रकरणात बऱ्याच राजकीय व्यक्तींनी,लोकप्रतिनिधी नी दबाव आणला परन्तु लोकशाहीच्या मार्गाने आम्ही उपोषण करून न्याय मिळवला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानापेक्षा कोणीच मोठे नाही.”