पुरंदरमधील गंभीर बाब !!!!        ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणा-या धनदांडग्यांच्या खडीमशिनला परवानगीच कशी???? सर्वसामान्यांचा संतप्त सवाल

पुरंदरमधील गंभीर बाब !!!! ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणा-या धनदांडग्यांच्या खडीमशिनला परवानगीच कशी???? सर्वसामान्यांचा संतप्त सवाल

नीरा
    
गुळूंचे कर्नलवाडी परिसरातील नियोजित खडिमशीन विरोधात सहा गावातील १७ ग्रामस्थांच आमरण उपोषण सासवड येथील दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर सोमवार पासून सुरु आहे. दुसऱ्या दिवशी रात्री दोघांची तब्येत खालवल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज तीसऱ्या दिवशी पुरंदरच्या तहसील रुपाली सरनोबत, प्रदिषण नियंत्रणाचे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत, पंचनामे केले. 

नियोजित खडिमशीन शेजारील शेतात शेतकऱ्यांनी कर्ज काढून पाईपलाईन केली आहे. ती शेती धोक्यात येऊ शकते, लगत असलेल्या पॉलीहाऊसला ही धोका पोहचू शकतो, विहिरींचे पाणी जाऊ शकते, पोल्ट्री नसताना पोल्ट्रीसाठी घेतलेली वीज घेतलेली गैरमार्गाने आहे, मेंढपाळांच्या चाऱ्याचा प्रश्न तसेच लगत असलेल्या बोलाईमाता प्राचीन गुहा धोक्यात येऊ शकते या कारणांमुळे खडिमशीन परिसरात नकोच अशी मागणी ग्रामस्थांनी करत आपले लेखी निवेदने दिली.

खडिमशीन विरोधात कर्नलवाडीचे माजी सरपंच सुधीर निगडे, लक्ष्मण वाघापूरे, भागा महानवर, पिंपरेचे माजी सरपंच दादासाहेब खरात, बाप्पू महानवर, पी.एल.निगडे, अरुण निगडे, बिरा बरकडे, कृष्णराव निगडे, अमर निगडे, हणुमंत निगडे, भगवान पवार, निलेश निगडे, दादासाहेब वाघापूरे, रोहिदास पवार, बाळू महानवर, सदाशिव महानवर हे शेतकरी व बोलाईमातेचे भक्त उपोषण करत होतो. मंगळवारी रात्री पी. एल. निगडे व बाळू महानवर यांची तब्येत खालवल्याने सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सोमेश्वरचे संचालक शैलेंद्र रासकर यांच्या नियोजित खडीमशीनला गुळूंचे ग्रामपंचायतीने कोणत्याही लेखी परवानगी दिली नव्हती, तरही कायद्याच्या पळवाटा काढत खडीमशीनसाठी शासकीय परवानग्या कशा काढल्या याबाबत गुळूंचे कर्नलवाडी ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले. या नियोजित खडिमशीन शेजारी मेंढपाळांच्या चराऊ जमिनीवर खडिमशीच्या धुळीमुळे मेंढपाळांचे प्रश्न निर्माण होऊ शक्तात. पुरंदर तालुक्यातील सर्व पक्षीय कार्याकर्त्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला.

गेली तीन दिवस खडिमशीन विरोधात आमरण उपोषण करत असल्याने उपोषणकर्ते संतप्त झाले आहेत. प्रशासनाने आमचा अंत पाहु नय, लवकरात लवकर तोडगा काढून खडिमशीनचा परवाणा रद्द करावा अशी भावना उपोष्णकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *