माळशिरस
पुरंदर तालुक्यातील आंबळे गावचा सुपुत्र विराज जगताप हा अत्यंत खडतर परिस्थितितुन कठोर परिश्रमातुन मेहनतीच्या बळावर अत्यंत कठीण असणारी एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीची परिक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे. विराजचे प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल खडकी येथुन झाले तर अकरावी व बारावीचे शिक्षण राजीव गांधी ई लर्निंग स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज याठिकाणी झाले.
विराजने जेईई परिक्षेची तयारी करत असतानाच एनडीए ची परिक्षा दिली होती.एनडीएच्या परिक्षेसाठी त्याने अतिरिक्त कुठलाही क्लास लावला नव्हता हे विशेष आहे.
तरिसुद्धा विराज हा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला.तसेच एसएसबी सुद्धा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला.विराज हा २८ डिसेंबर २०१९ रोजी एन डी ए मध्ये जॉईन होऊन त्याने तीन वर्ष एनडीएचे खडतर ट्रेनिंग पुर्ण केले आहे.त्यानंतर पुढील ट्रेनिंग साठी एक महिन्याने डेहराडून ला जॉईन होणार आहे.
विराजला लहानपणापासूनफुटबॉल,क्रिकेट,बुद्धिबळ ,कराटे या खेळामध्ये विशेष आवड असुन त्याने या खेळामध्ये विषेश असे प्राविण्य मिळवले आहे.
विराजचे वडील राजेंद्र जगताप हे टाटा मोटर्स पुणे याठिकाणी कार्यरत असुन विराजच्या या यशात त्यांचा व त्यांची पत्नी वैशाली यांचे मोलाचे योगदान आहे.विराजच्या या यशाच्या आनंदाची बातमी सांगताना वडिल राजेंद्र जगताप यांचे अश्रु अनावर झाले.
विराजच्या या यशाचे आंबळे गावातुन तसेच पुरंदर तालुक्यातुन कौतुक होत असुन विराजच्या या यशामुळे आंबळे गावातील प्रत्येकाची छाती अभिमानाने भरुन आली आहे.