पुण्यात कोयता गँगनंतर आता आली पालघन गँग; गाडी हळू चालवा सांगितलं तर माजवली दहशत

पुण्यात कोयता गँगनंतर आता आली पालघन गँग; गाडी हळू चालवा सांगितलं तर माजवली दहशत

पुणे

पुण्यात कोयता गँगनंतर आता पालघन गँग समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे गाडी हळू चालवा असे सांगितल्याने काही तरुणांनी हातात पालघन घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोठा वाद पाहायला मिळाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे पालघन गँगचा काही स्थानिक नागरिकांशी वाद झाला. काल, संध्याकाळी हा वाद झाला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी परिसरात काही तरुण जोरात गाडी चालवत होते. तिथे असलेल्या एका महिलेने मुलं खेळत असल्याने दुचाकीस्वारांना हळू गाडी चालवा म्हणून सांगितले. मात्र, त्याचा राग मनात धरुन त्या तरुणांनी थेट पालघन हे हत्यार काढले आणि दहशत माजवली.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हिडिओमध्ये दिसत असलेले हत्यार हे कोयता नसून पालघन आहे. पालघन हे कोयत्यासारखे दिसते पण त्याची लांबी कोयता पेक्षा जास्त असून शेती कामासाठी ते वापरले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *