पुणे
पुण्यात वैकुंठधाम स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत चितेजवळ शुक्रवारी रात्री दोन तृतीयपंथी काही विचित्र अघोरी कृत्य करत असल्याचं सुरक्षारक्षकाने पाहिले. त्यानंतर त्याने पोलिसांना याची माहिती दिली.माहिती मिळताच, पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा, तृतीयपंथी काळ्या बाहुल्या, लिंबू तसेच काही फोटो वापरून अघोरी कृत्य करत होते. तसेच काही मंत्राचाही जप ते करत असल्याचंही पोलिसांच्या लक्षात आलं. या प्रकारानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.लक्ष्मी निभाजी शिंदे (वय ३१) आणि मनोज धुमाळ (वय २२) असे अघोरी कृत्य करणाऱ्या आरोपींचे नावे आहेत. शिंदे हा मुंबईचा आहेत तर मनोज धुमाळ हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान घडली. स्मशानभूमी मधील सुरक्षारक्षक राऊंड मारण्यासाठी गेले असता त्यांना हे दोघेही आरोपी काळी जादू करताना आढळून आले.