पुणे
कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे लिंबू विक्रेत्यांवर कारवाई झाली होती. बाजारातून लिंबू विक्रेते पूर्णपणे बंद केल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनंतर याप्रकरणी अधिकारी, अडते यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले. ही कारवाई रद्द करावी; यासाठी बाजार समितीतील संघटनांनी बंद पुकारला आहे.
यामुळे पुण्यातील मार्केटयार्ड गुरूवारी बंद राहणार आहे.पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत सहा महिन्यांपुर्वी लिंबू विक्री करणाऱ्यांवर कारवाई झाली होती. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत लिंबू विक्री बंद केली होती. यामुळे सहा महिन्यानंतर माजी प्रशासक, अधिकारी, कर्मचारी व अडत्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल होता.
हा गुन्हा रद्द व्हावा या मागणीसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.मार्केट यार्डमधील अधिकारी, कर्मचारी व अडत्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी आज सर्व संघटनांच्यावतीने मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी केली असून खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करत एक दिवस बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.