पुणे
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. दुहेरी हत्याकांडाने पिंपरी-चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जमीन खोदण्याच्या टिकावणे पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड मधील दापोडी परिसरात घडली आहे.
खून केल्यानंतर आरोपी रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. या प्रकरणी आरोपीला भोसरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. शंकर नारायण काटे आणि संगीता काटे अशी हत्या झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत. तर प्रमोद मगरुडकर (वय- 47) असे आरोपीचे नाव असून त्याला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घटनेत शंकर नारायन काटे आणि त्याच्या पत्नीचा संगीता काटे जागीच मृत्यू झाला.
या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं पिंपरी चिंचवड परिसर हादरलं आहे. अद्याप या दुहेरी हत्येचे कारण अस्पष्ट आहे. ही घटना शनिवारच्या रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी तत्काळ येऊन आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.