पुण्यातील खळबळजनक घटना!!!!                        आधी मुलांना व बायकोला विष दिले व नंतर स्वतःने गळफास घेत संपविले जिवन

पुण्यातील खळबळजनक घटना!!!! आधी मुलांना व बायकोला विष दिले व नंतर स्वतःने गळफास घेत संपविले जिवन

पुणे

पुण्यात एका तरुणान आधाविष देऊन कुटुबायाची हत्या केली आणि त्यानंतर गळफास लावुन घेतला.अमित यादव असे मृताचे नाव आहे.आधी त्याने बायको टीना यादव आणि ३ वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाच्या मुलाची विष देऊन हत्या केली आणि नंतर गळफास लावुन घेतला.४ जणांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली.सुसाईड नोटमध्ये कर्जामुळे त्रस्त असल्याचे म्हटले.

पुण्यातील मंदनाचौकी परिसरात राहणाऱ्या अमित यादवने कर्जाला कंटाळुन बायको आणि मुलांची विष पाजुन हत्या केली आणि नंतर स्वत: जीवन संपवल.

दरम्यान,अमितने मंगळवारी सकाळी त्याच्या कुटुंबीयांचा फोन उचलला नाही,तेव्हा भगीरथपुरा येथे राहणाऱ्या त्याच्या सासरच्या मंडळींना कळवण्यात आले.

यानंतर सासु-सासरे व कुटुंबीय भाड्याच्या खोलीवर पोहोचले असता कोणीही दरवाजा उघडत नव्हते.अशा स्थितीत पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचुन दरवाजा तोडला असता अमित यादवचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळुन आला.तर शेजारीच दोन्ही मुले आणि बायको बेडवर मृत अवस्थेत पडलेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *