पुणे
भारती विद्यापीठ कात्रज येथील कॅम्पस मध्ये स्टाफ महिला डॉक्टरांच्या क्वार्टर रूम व बाथरूम मध्ये कॅमेरे सापडल्याच्याविरोधामध्ये भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शिवसेना पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने शहर संघटिका सौसविताताई मते यांच्या मार्गदर्शनाने तीव्र निषेध व्यक्त करत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
संबंधित घटनेत दोषी असलेल्या व्यक्तींना तातडीने अटक करावी सर्व महिला स्टाफ क्वार्टर मध्ये कॅमेऱ्यांविषयी चेकिंगव्हावे,कॅम्पस मधील महिलांना पुरेशी सुरक्षा मिळावी अशा मागण्या या अर्जाद्वारे करण्यात आल्या. यावेळी शिवसेनामहिला आघाडीच्या नेहा कुलकर्णी , प्रांजल झगडे , सायली शेडगे , नेहा नाईक , मनीषा जरे , प्रीती कारंजकर , गौरीढमाले आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.