पुणे
महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईमध्ये करोना रुग्ण सक्रिय असल्याची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये ४९ रुग्ण सक्रिय आहेत तर पुण्यामध्ये ५४ करोना रुग्ण सक्रिय आहेत. महाराष्ट्रासह भारतासाठी हा चिंतेचा विषय झाला असून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने आव्हान केले जात आहे.
कोरोनाने चीन आणि अमेरिकेमध्ये हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये सध्या कोरोना प्रादुर्भावाने मृत्यूचे तांडव सुरू झाले असून चीनपाठोपाठ अमेरिकेतही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.
वली आहे. सर्व देशांनी दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे. भारतातही केंद्रिय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यातच आता पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेला १ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे. विमानतळावर या व्यक्तीची कोरोनाचाचणी करण्यात आली. कोरोना तपासणीसाठी नमुना प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यात या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यात सध्या कोरोनाचे ५४ सक्रिय रुग्ण आहेत.