पुणे जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना!!!!! खेळता-खेळता १० वर्षांची चिमुकली छतावर गेली,वीजवाहीनीचा धक्का लागून मृत्यू

पुणे जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना!!!!! खेळता-खेळता १० वर्षांची चिमुकली छतावर गेली,वीजवाहीनीचा धक्का लागून मृत्यू

पुणे

घराच्या छतावर लटकणाऱ्या वीज वाहिनीचा धक्का लागून एका १० वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातल्या बोपोडी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेस जबाबदार असणाऱ्या घर मालकाविरोधत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुभ्रा ओहाळ (वय १०) असं या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.

तर या घटनेस जबाबदार असणाऱ्या महेमुद्दीन मगदूम (रा. बोपोडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश अरविंद ओहळ यांनी खडकी पोलिसात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश ओहाळ बोपोडीतील पवळे चाळीत अनेक दिवसांपासून राहायला आहेत. स्थानिक रहिवासी असलेले मगदूम यांचे ते भाडेकरी आहेत. शुभ्रा ही घराच्या छतावर गेली.

त्यावेळी त्या घराच्या छतावर उच्च दाबाची वीजवाहिनीची तार लटकत होती. या तारेला हात लागताच शुभ्राला काही समजायच्या आत त्या तारेचा जोरात झटका बसला आणि ती जागेवरच कोसळली. या दुर्घटनेत शुभ्रा गंभीर जखमी झाली होती.

ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्यावर तिला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मगदूम याने या परिसरात दोन मजली घर बांधले होते. त्याने बांधलेल्या घरावर महावितरणची उच्च वीज वहिनी गेली आहे.

ही तार छतावर लटकत होती.उच्चदाबाच्या वीजवाहिनीच्या संपर्कात आल्यानंतर गंभीर दुर्घटना होऊ शकते, याची जाणीव घरमालक मगदूम याला असूनही मगदूम याने बेकायदा बांधकाम केले होते.

त्यामुळे घरमालकाच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे शुभ्राचे वडील गणेश ओहाळ यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून महेमुद्दीन मगदूम याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *