पुणे जिल्ह्यातील “या” भागात मुलींच्या गुलाबी टोळीची दहशत;भर रस्त्यात तरुणींना तुडवलं

पुणे जिल्ह्यातील “या” भागात मुलींच्या गुलाबी टोळीची दहशत;भर रस्त्यात तरुणींना तुडवलं

पुणे

औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत भाईगिरी करणाऱ्या गावगुंड मुलांची दहशत पाहायला मिळत होती. मात्र आता शहरात महाविद्यालयीन मुलींच्या गुलाबी टोळीची दहशत पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलींच्या या टोळीने शहरात धुमाकूळ घातला आहे. कॉलेज सुटल्यानंतर तरुणींचं हे टोळकं मुलींना मारहाण करत आहेत. या घटनेचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत.ज्या वयात महाविद्यालयीन मुलींनी आपलं शैक्षणिक भविष्य घडवायला हवं, त्या वयात या मुली एकमेकांवर दगडफेक करून एकमेकांना दगडाने ठेचण्याचा प्रयत्न करत आहेत. आपआपसातल्या झालेल्या किरकोळ वादातून पिंपरी-चिंचवड गावातील एका महाविद्यालयीन मुली अगदी बेभान होऊन एकमेकींना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी तुडवत आहेत.

गुलाबी टोळीच्या मुली फक्त एकमेकींना मारहाणच करत नाही. तर त्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी मुलींना भररस्त्यात अडवतात आणि मारहाण करतात. काही दिवसांपूर्वी मुलींच्या या टोळक्याने एका मुलीला बेदम मारहाण केली होती. आता अशाच प्रकारचे काही व्हिडिओ समोर आले आहेत.

गुलाबी टोळीच्या मुलींचे भांडण काही सजग नागरिक सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हा भांडण फक्त काही काळापुरता थांबत आहे. दुसऱ्या दिवशी परत सूड घेण्यासाठी या मुली एकमेकांना लाथा बुक्क्यांनी तुडवतात. या मुलींना आपल्या पालकांचं, महाविद्यालयाचं तसेच पोलिसांचा कुठलाही धाक दिसत नाहीये.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की भररस्त्यात कसं हे मुलींचं टोळकं इतर मुलींना मारहाण करत आहेत. आता या महाविद्यालयातील गुलाबी टोळीची दहशत मोडून काढण्यासाठी महाविद्यालय आणि पोलिस प्रशासन काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचं असणार आहे. नागरिक दररोज घडत असलेल्या या प्रकारामुळे त्रस्त झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *