पुणे
पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिकेच्या अधिकार्यांनी कार्यालयीन वेळेतच हुरडा पार्टी केल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे.
दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यावर या अधिकार्यांनी परत नगरपालिकेकडे पाहिलेच नाही दुपारनंतर हे अधिकारी कार्यालयीन वेळेत कार्यालयातच हजर नसल्याचे दिसुन आले होते.
यांच्या हुरडा पार्टीच्या नादात कार्यालयीन कामकाज पुर्णपणे ठप्प झाल्याचे पहायला मिळाले होते.
आता वरिष्ठ अधिकार्यांनी या नगरपालिकेतील १९ अधिकार्यांना नोटीस बजावली असल्याचे कळाले आहे.
आता या नोटीशीनंतर या १९ अधिकार्यांवर काय व कोणती कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.