पुणे
कोरोना संसर्गाच्या वाढत्या संख्येमुळे मिरवडी मेमाणवाडी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी,कामगार वर्गांनी मोठ्या प्रमाणात १ ला आणि दुसरा डोस पूर्ण करून घेतला त्यामध्ये एकूण ३६० लोकांचे लसीकरण करण्यात आले.
या लसीकरण मुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मिरवडी गाव १००% लसीकरण च्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेय ,या प्रसंगी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मिरवडी चे वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर , सरपंच, उपसरपंच, सदस्य,ग्रामसेवक, कर्मचारी, आजी माजी पदाधिकारी व युवा सहकारी मित्रांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.
ग्रामपंचायत मिरवडी तर्फे लसीकरणात सहभाग घेऊन आपला गाव कोरोनामुक्त गाव बनविण्यासाठी सहभाग घेणार्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानण्यात येत आहेत.