पुणे जिल्ह्यातील “या” गावात वडिलांनी रागवल्याचा राग मनात धरून सोळा वर्षीय मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

पुणे जिल्ह्यातील “या” गावात वडिलांनी रागवल्याचा राग मनात धरून सोळा वर्षीय मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

पुणे

लहान मुलांमध्ये खेळू नको, असे रागावून वडील म्हणाल्याचे राग मनात धरून विंझर (ता. राजगड) धनगरवस्ती येथील एका 16 वर्षीय मुलाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गणेश गोसू चव्हाण (वय-16) असे मृत मुलाचे नाव असून मंगळवार (ता. ०५) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मुलाच्या वडिलांनी वेल्हे पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना वेल्हे पोलिसांनी सांगीतले कि, विंझर येथील धनगरवस्ती येथे 5 ऑगस्ट रोजी गणेशला वडिलांनी लहान मुलांमध्ये खेळू नको असे खवळल्याने तो राग मनात धरून घरी कोणी नसताना गोठ्याजवळ असणाऱ्या चिंचेच्या झाडावरती स्वतःला लटकवून घेतले.

तो कोणत्याही प्रकारची हालचाल करत नसल्याने त्याने आपल्या जीवाचे बरे वाईट करून घेतले आहे. असे दिसून आल्याने लागलीच मुलाचे वडील यांनी वेल्हे पोलीस स्टेशन येथे पोलिसांना माहिती कळवली.

पोलीस आल्यानंतर त्याला खाली घेऊन ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे उपचार करता आणले असता तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर तो मृत झाल्याबाबत कळवले. याबाबत वेल्हे पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मांडके करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *