पुणे जिल्ह्यातील “या” गावात नात्याला काळीमा!!!!!!                               आजोबांकडून अल्पवयीन नातीवर अत्याचार

पुणे जिल्ह्यातील “या” गावात नात्याला काळीमा!!!!!! आजोबांकडून अल्पवयीन नातीवर अत्याचार

पुणे

पुण्यातील कोंढवा परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.६० वर्षीय आजोबांनी आपल्याच ११ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही इयत्ता चौथीमध्ये शिकत असून कोंढवा भागात एका शाळेतील शिक्षण घेते.दरम्यान शाळेतील शिक्षक चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच या विषयाची माहिती देत होते.यावेळी पीडित मुलीने डिसेंबर महिन्यात तिच्या बरोबर घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितला.

जब घर मे कोई नही होता था तब मुझे दादाजी गोद मे बिठाते थे, असे सांगत या चिमुरडीने आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती शिक्षकांना दिली.या घटनेने संतापाची लाट पसरली आहे.मुलीने शिक्षकांना सांगितल की, आजोबा आधी मला अश्लील व्हिडिओ दाखवायचे आणि यावरच ते थांबायचे नाही तर मी ओरडले तर ते माझे तोंड दाबून मला गप्प करायचे. पीडित मुलीने आपल्या शिक्षकांना ही आपबिती सांगितली.घडलेल्या प्रकरणानंतर शिक्षकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर आरोपी विरोधात कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी आजोबांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *