पुणे
पतीवर मृत्यूचे सावट असून त्याच्यावर उपाय म्हणून महिलेस व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला नग्न हाेण्यास सांगत तिचे छायाचित्र काढले. त्याआधारे ब्लँकमेल करुन महिलेवर एका मांत्रिकाने अत्याचार केलीची घटना आंबेगाव तालुक्यात घडली आहे.
या घटनेबाबत मंचर पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार विक्रम गायकवाड या मांत्रिकाने एका महिलेवर सातत्याने अत्याचार केल्याची तक्रार तिने नाेंदवली आहे. तिला ब्लॅकमेल करुन सातत्याने तिला त्रास दिल्याचे महिलेने म्हटले आहे.

या मांत्रिकाने तुझ्या पतीवर मृत्युचे सावट आहे. यावर उपाय म्हणुन त्याने मला विवस्त्र होण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने माझी छायाचित्र काढली. त्याचे स्क्रीन शॉट काढून मला ब्लॅकमेल करण्यास प्रारंभ केला.
माझ्या असाहाय्यतेचा गैरफायदा घेत वारंवार अत्याचार केला. या मांत्रिकावर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. दरम्यान संबंधित मांत्रिकाचा शाेध घेत आहे अशी माहिती मंचर पोलिसांनी दिली.