पुरंदर
पुरंदर तालुक्यातील आंबळे या गावात श्री काळभैरवनाथ यांच्या उत्सवमुर्तीची चंपाषष्टीच्या शुभमुहुर्तावर प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली.
या दिवसाचे औचित्य साधुन संपूर्ण गावात प्रत्येक नागरिकाने आपापल्या घरासमोर गुढी उभारुन आनंद साजरा केला.
“ न भुतो न भविष्यती “ अशा योगाचे संपूर्ण आंबळे गाव आज साक्षीदार झाले.आपल्या हयातीत हा योग परत येणार नसल्याने सर्वच ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाने पुर्ण आंबळे गाव नाथसाहेबाच चांगभल या जयघोषात न्हाऊन निघाले असल्याचे जाणकारांनी सांगीतले.