पुणे
बारामती तालुक्यातील चोपडज येथे सरपंच पुष्पालता जगताप यांच्या घरी दोघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत अंदाजे १० तोळ्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे.
चोपडज येथील प्रा. बाळासाहेब जगताप व सरपंच पुष्पलता जगताप यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम असल्याने दहा फाटा येथील सोमनाथ मंगल कार्यालयात हळदीचा कार्यक्रम होता.
घरातील सगळे तिकडे होते. रात्री २ च्या दरम्यान चोपडजच्या सरपंच पुष्पलता जगताप या घरी एकट्या असताना दोघा चोरट्यांनी डाव साधत चाकूचा धाक दाखवून अंदाजे १० तोळे सोने चोरट्याने लुटले आहे.