पुणे
व्याजाने घेतलेले पैसे परत मिळविण्यासाठी सावकारांने सतत लावणाऱ्या तगाद्याला कंटाळून सहकार विभागातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गणेश शंकर शिंदे वय ५२ वर्ष राहणार बालाजी हाईट्स, मंगळवार पेठ असं आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.या अधिकाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विजय सोनी,बाळकृष्ण क्षीरसागर,गणेश साळुंखे,मनीष हाजरा यांना अटक केली आहे.
तसंच विजय सोनी याचे वडील,पंधरकर,शंकर लक्ष्मण गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत शिंदे यांच्या पत्नी शोभना शिंदे यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.