पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या आंबळे ग्रामपंचायतमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पुजन करुन अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचा गजब प्रकार ३१ मे रोजी सकाळी ११ः१७ मिनीटांनी घडला आहे.
३१ में रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती संपुर्ण राज्यात उत्साहात साजरी करण्यात आली परंतु अपवाद ठरली ती आंबळे ग्रामपंचायत.
ग्रामपंचायत कार्यालयीमध्ये सरपंचांच्या उपस्थितित अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली परंतु अहिल्यादेवी होळकर समजुन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले ही गोष्टच खुप लाजीरवाणी व खेदजनक आहे.
जर ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिकास अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांच्यातील फरक समजत नसेल तर ही गोष्ट खुप गंभीर असल्याची सध्या गावात कुजबुज सुरु आहे.
याप्रकरणी ग्रामसेवकांशी संपर्क केला असता ते रजेवर असल्याचे कळले तर सरपंचांशी संपर्क होऊ शकला नाही.