पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार !!!!!                      सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील शिधापत्रिका न मिळाल्याने दवाखान्यातील बिल भरण्यासाठी एकाला गावाकडचे घर विकावे लागले असल्याची चर्चा !!!! काहींच्या दारात स्कॉर्पिओ,गळ्यात सोन्याची माळ,हातात अंगठी तरीपण पिवळे रेशनकार्ड???

पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार !!!!! सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील शिधापत्रिका न मिळाल्याने दवाखान्यातील बिल भरण्यासाठी एकाला गावाकडचे घर विकावे लागले असल्याची चर्चा !!!! काहींच्या दारात स्कॉर्पिओ,गळ्यात सोन्याची माळ,हातात अंगठी तरीपण पिवळे रेशनकार्ड???

पुणे

दौंड तहसील कार्यालयात अनेक वर्षांपासून शिधापत्रिकांचा घोळ असून याबाबत तहसीलदार संजय पाटील अकार्यक्षम अधिकारी ठरले आहेत,पुरवठा अधिकारी भोंडवे यांच्याकडून सतत टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत,माननीय जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत दौंड तहसील कार्यालयातील कारभारावर लक्ष घालावे अशी मागणी सर्वसामान्य लोकांकडून होत आहे.

दौंड तहसील कार्यालयात शिधापत्रिका मिळण्यासाठी अनेक जणांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे परंतु याबाबतचा कसलाही डाटा पुरवठा अधिकारी भोंडवे यांच्याकडे नाही तसेच शिधापत्रिका मिळण्यासाठी पाच वर्षांमध्ये जमा झालेल्या कागदपत्रांची संख्या त्यातून मंजूर झालेल्या शिधापत्रिकांची संख्या व कागदपत्रांची पूर्तता कमी असलेल्या शिधापत्रिकांची संख्या हरवलेल्या कागदपत्रांची संख्या तलाठी कार्यालयात प्रलंबित शिधापत्रिका कागदपत्रांची संख्या तसेच इतर बाबीं बाबत प्रलंबित शिधापत्रिका कागदपत्रांची संख्या असा कुठलाही डाटा दौंड तहसील कार्यालयात नसून याबाबत तहसीलदार संजय पाटील यांना विचारले असता त्यांनी पुरवठा अधिकारी भोंडवे यांना भेटा असे असे सांगितले परंतु भोंडवे यांच्याकडे चौकशी केल्यावर शिधापत्रिका न बाबत माहिती देण्यास अक्षम ठरले आहेत.

एका व्यक्तीला शारीरिक व्याधी बाबत डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले परंतु परिस्थिती नाजूक असल्याने व्यक्तीला काही सुचत नव्हते अवाढव्य खर्च कसा करावा यातून प्रश्न निर्माण होत होते परंतु डॉक्टरांनी शिधापत्रिका असल्यास तुम्हाला शासकीय योजनेमध्ये ऑपरेशन फुकट होईल असे सांगितले ऑपरेशनला वेळ असल्याने सदर व्यक्तीने दौंड तहसील कार्यालय मध्ये तात्काळ सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शिधापत्रिका मिळण्यासाठी अर्ज केला.

परंतु दौंड तहसील कार्यालयातून कागदपत्रे गायब झाल्याचे त्याला समजले संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शेवट दोन-तीन महिने वाट पाहून सदरील व्यक्तीला गावाकडचे घर विकून ऑपरेशनचा खर्च करावा लागला या व्यक्ती बाबत अनेक ठिकाणी हळहळीची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहेत.

एकीकडे दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल आरोग्यदूत नावाने प्रसिद्ध आहेत, आरोग्य विषयी शासकीय योजनांमधून अनेक गोरगरिबांना त्यांनी जणू जीवनदान दिले आहे, परंतु त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात तहसीलदारांच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांना घर विकून दवाखान्याची बिले भरण्यासाठी वेळ आली आहे, त्यामुळे आमदार राहुल कुल यांनी शिधापत्रिकांचा नक्की घोळ काय हे तपासणे गरजेचे आहे, त्यामुळे अनेकांचे घरे उध्दव होण्यापूर्वीच वाचतील.

दौंड तालुका प्रहारचे रमेश शितोळे यांनी तहसील कार्यालयासमोर असणाऱ्या खाजगी एजंट बाबत नाराजी व्यक्त केली असून गरीबाकडे पांढरे शिधापत्रिका तर श्रीमताकडे पिवळे शिधापत्रिका असल्याने शासनाने सर्वेक्षण करून योग्य व्यक्तिस योग्य शिधापत्रिका देणे गरजेचे असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *