पुणे
मैत्रीणेने राहत्या घरी साडीने गळफास घेतला तिला रूग्णवाहिकेमधून रुग्णालयात घेऊन जात असताना पाहताच, एका मुलीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील शेवाळवाडी येथे घडली आहे.
दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.सानिका हरिश्चंद्र भागवत (वय- १९ ) व आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय- १९) अशी आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावे असून वरील धक्कादायक प्रकार शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ क्रिस्टल सोसायटी या इमारतीत सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.हडपसर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा भागवत व सारिका गायकवाड या दोघी बालपणीच्या मैत्रिणी होत्या. सात वाजण्याच्या सुमारास सारिकाने आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळतच पेट्रोलिंग करणारे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते.सारिकाचा मृतदेह पोलिस रूग्णवाहिकेमध्ये घेऊन जात असतानाच,आकांक्षाने पाहिलं व तिने त्याच इमारतीचा पाचवा मजला गाठला.
पाचव्या मजल्यावरन उडी घेतली व ती रुग्णवाहिकेजवळ पडली. उंचीवरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेला आकाक्षांचा देखील मृत्यू झाला.अचानक घडलेल्या घटनेमुळे एकच घबराट उडाली असून, या दोघी मैत्रींणीनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप समजलेलं नाही. दरम्यान, पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.