पुणे जिल्ह्यातील दुर्दैवी घटना !!!!           बिबट्या बनला नरभक्षक; “या” गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू!

पुणे जिल्ह्यातील दुर्दैवी घटना !!!! बिबट्या बनला नरभक्षक; “या” गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू!

पुणे

दौंड तालुका सध्या बिबट्याच्या दहशतीखाली आहे. काही दिवसांपूर्वीच बोरीपार्धी हद्दीत बिबट्याने सहा महिन्याच्या बाळाचा बळी घेतल्यानंतर आता तालुक्यातील कडेठाण येथे शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेवर बिबट्यांना हल्ला करून तिचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली.

गेलं काही महिन्यात दौंड तालुक्यात बिबट्याने अक्षरक्षा धुमाकुळ घातला आहे. भीमा नदीच्या पट्ट्यात असलेल्या दौंड तालुक्यातील कानगाव, हातवळण, नानगाव, कडेठाण तर शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, गणेगाव, सादलगाव, वडगाव रासाई या भागात बिबट्याने तांडव केले आहे.

शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांची शिकार करणारा बिबट्या आता माणसाचीही दिवसाढवळ्या शिकार करू लागला आहे. जी भीती शेतकऱ्यांना आणि नागरिकांना होती, ती भीती आता खरी ठरू लागली आहे.

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे दौंड तालुक्यात दोघांचा निष्पाप बळी गेला आहे. दौंड तालुक्यातील कानगाव आणि कडेठाण गावच्या शिवेवर असलेल्या कडेठाण हद्दीत शनिवारी (दि ७) सायंकाळी चार वाजता च्या आसपास शेतकरी धावडे यांच्या शेतात काम करणाऱ्या लताबाई बबन धावडे (वय ५० ,रा.कडेठाण) यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्यांना उसाच्या शेतात फरफटत नेले.

या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पुन्हा एकदा दौंड तालुक्यात खळबळ उडाली असून शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *