पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!!!!!! कामगाराकडून आश्रमातील तीन गतीमंद तरुणींवर लैंगिक अत्याचार

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!!!!!! कामगाराकडून आश्रमातील तीन गतीमंद तरुणींवर लैंगिक अत्याचार

पुणे

पुणे जिल्ह्यातुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्य़ातील केडगाव परिसरातील आश्रम शाळेत ३ गतीमंद तरुणींवर मजूर कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील केडगाव परिसरात प्रसिद्ध असलेल्या पंडिता रमाबाई महिला आश्रमातील ३ गतीमंद तरुणींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आश्रम शाळेतील मजूर कामगारानेच हा लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.मोजस जोरे असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

मोजेस हा आश्रम शाळेतील वॉल कंपाऊंड बांधणारा कामगार म्हणून गेल्या तीन महिन्यापासून त्या ठिकाणी काम करत होता. आरोपीने महिला आश्रमातील तीन गतीमंद मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती मिळताच आरोपीला यवत पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *