पुणे
अल्पवयीन मुलीवर मागील एक वर्षापासून वांरवार लैंगिक अत्याचार करून या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी कांचन परिसरात उघडकीस आला आहे.
उरुळी कांचनमध्ये तरुणावर गुन्हा, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
गुन्ह्याची नोंद आणि आरोपीची ओळख
• याप्रकरणी एका 30 वर्षीय तरुणावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
• विनायक वकील चव्हाण (वय -30, रा. इंदिरानगर उरुळी कांचन ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली आहे.
• हि घटना जुलै 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून ते मार्च 2025 या कालावधीत घडली.
• याप्रकरणी एका 18 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
घडलेली घटना आणि अत्याचाराचे स्वरूप
• पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा मुलीच्या ओळखीचा होता.
• अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही, आरोपीने जिवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
• या अत्याचारांमुळे ती गर्भवती राहिली.
गुन्ह्याची नोंद आणि तपास
• या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 226/2025 भा. दं. संहिता कलम 64(1), 64(2)(i), 64(2)(m), 351(2)(3) तसेच ‘पोक्सो’ कायद्यातील कलम 4, 6, 8, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
• दरम्यान, या घटनेचा तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मिरा मटाले करीत आहेत.